रविवार, २७ मार्च, २०११

२७ मार्च या जागतिक रंगभूमी दिनानिमित्त थोडसे....

नमस्कार मित्रांनो, २७ मार्च या जागतिक रंगभूमी दिनानिमित्त थोडसे.... मराठी मातीशी बांधिलकी असल्याने आज असणार्र्या २७ मार्च या जागतिक रंगभूमी दिनानिमित्त थोडसे लिहावेसे वाटले म्हणून हे शब्दांचे तुम्हा कलारासिकांशी थोडेसे हितगुज... मित्रांनो मराठी रंगभूमीवर सातत्याने नव-नवीन प्रयोग होतात... नाटकातून अभिव्यक्त होणारा अभिनय टीवी किवा रुपेरी पडद्यापेक्षा कितीतरी सकस आणि सशक्त असतो हे मराठी रंगभूमीने दाखवून दिले आहे. वी. वा. शिरवाडकर, विजय तेंडूलकर, चित्तरंजन कोल्हटकर, श्रीराम लागू, निळू फुले, शिवाजी साटम, प्रशांत दामले, चंद्रकांत कुलकर्णी वामन केंद्रे, व मकरंद अनासपुरे यांनी रंग्भूमिवरूनच आपल्या कारकीर्दीचा ठसा उमटवला आहे. रंगभूमीला चांगले दिवस यावेत यासाठी राज्य सरकारनेही अनुदान जाहीर केले आहे, परंतु तरीही या महाराष्ट्रातील प्रेक्षकवर्ग चार भिंतीच्या आतील छोट्या पडद्यात अडकला आहे याची मात्र खंत वाटते. नाट्य क्षेत्राला आज व्यावसायिक रूप जरी मिळाले असेल तरी मात्र यानिमित्ताने का होईना नव्या पिढीच्या युवकांनी नाट्य क्षेत्राकडे गांभीर्याने पाहायला हवे. अभ्यासपूर्ण नवनिर्मिती होऊन मराठी रंगभूमीवर चांगले प्रयोग होणे गरजेचे आहे. चित्रपट आणि नुसत्याच मालिका निर्मिती करण्याकडे वळलेला वर्ग नाट्य निर्मितीकडे पाठ फिरवू लागलाय आणि मराठी प्रेक्षक वर्गही हळूहळू रंगभूमीकडून दूर होत चाललाय. आता हे कुठेतरी थांबवण्यासाठी आजच्या नाट्यक्षेत्रातील युवकांनी गांभीर्याने विचार करायलाच हवा. कारण समाजातील वास्तव घटनेचे चित्र अभिव्यक्त होण्याचे रंगभूमी हेच एकमेव सशक्त माध्यम आहे. मग चला तर जाणीव ठेवूया, रंगभूमीला वाचवण्याची शपथ घेवूया... सचिन एस. अंभोरे, एम. सी . एन . न्यूज औरंगाबाद.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा